आज (दि.१५) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही नेते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार होते. पण हा दौरा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ” आज (दि.१५) मुख्यमंत्री महोदय, मी, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, यांचा दिल्ली दौरा होता.तो रद्द करण्यात आला आहे. सोमवारी (दि१८) हा दौरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दौरा रद्द होण्याच सांगितले कारण…
शेती प्रश्नासह आदी मुद्द्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह काही नेत्यांची अमित शाह यांची भेट घेणार होती, पण अमित शाह व्यस्त असल्यानं भेट रद्द झाली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलत असताना अजित पवार म्हणाले की, “अमित शाह यांना बरीच महत्त्वपूर्ण काम असतात. ते व्यस्त असल्याने आमची आजची ही भेट रद्द झाली आहे. आजच्याऐवजी सोमवार (दि.१८) किंवा मंगळवारची (दि.१९) वेळ अमित शाह यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसह आम्ही सोमवारी भेटीची वेळ मागितली आहे”
पीएचडी संदर्भात म्हणाले…
अजित पवार यांनी पीएचडी विद्यार्थ्यांच्या संदर्भात ” पीएचडी करुन दिवे लावणार आहेत का? ” असं वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल बोलत असताना ते म्हणाले की, “माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असून मी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे आणि सारखं सारखं ते उकरुन काढू नका आणि माझे विरोधक आहेत ते याचा बाऊ करणारचं.