इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या सिटीस्कॅन मशीनचा आमदार प्रकाश आवाडे माणूसकी फौंडेशनच्या संस्थापक रवी जावळे आणि वयोवृद्ध रुग्ण विमल चौगुले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल.सीटीस्कॅन कामी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने या ठिकाणी सिटीस्कॅनची सुविधाही देण्यात आली आहे. या सिटीस्कॅन मशीनचा शुभारंभ सोमवारी आमदार प्रकाश आवाडे माणुसकी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रवी जावळे यांच्या हस्ते आणि वयोवृद्ध रुग्ण विमल चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे, रुग्ण कल्याण सदस्य कपिल शेटके उपस्थित होते.रुग्नांना अत्यंत कमी दरात सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. याप्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मौलाना जमादार, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, सुनील पाटील, महिला आघाडी अध्यक्ष उर्मिला गायकवाड, संजय केंगार, महादेव कांबळे, चंद्रकांत पाटील, नरसिंह बारीक, रमेश कबाडे, अविनाश कांबळे, नितेश पवार, विजय पाटील, राजेंद्र बचाटे, रमेश पाटील, राजमा शेख, मंगल सुर्वे सपना भिसे, अंजू मुल्ला, अलका शेलार, सीमा कमते, तुळसाबाई काटकर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी, डॉक्टर दिलीप वाडकर, डॉक्टर सुनील देशमुख, डॉक्टर प्रकाश मोरे, सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक भारत शिंदे, सौ सीमा कदम, इजाज मुल्ला, योगेश सरवदे, सिटीस्कॅन टेक्निशियन ऋषिकेश रावळ, प्रशांत शिंगाडे अभिजीत जगदाळे आदींचा परिसेविका आधी परिचारिका कर्मचारी रुग्ण व माणुसकी फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.