होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई अंतर्गत ‘प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक- बी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी)’ पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख १९ आणि २१ डिसेंबर २०२३ आणि ४ जानेवारी २०२४ ही आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची माहिती जाणून घेऊया.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र मुंबई भरती २०२४ –
पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक- बी, तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी)
एकूण पदसंख्या – ३
शैक्षणिक पात्रता –
प्रकल्प सहाय्यक : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक – बी : ६० टक्के गुणांसह १२ वी पास.
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी) : सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
वयोमर्यादा – २८ ते ३३ वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता –
मुलाखतीची तारीख – १९, २१ डिसेंबर २०२३ आणि ४ जानेवारी २०२४
अधिकृत वेबसाईट
https://hbcse.tifr.res.in/
महिना पगार –
प्रकल्प सहाय्यक – ३७ हजार ७०० रुपये.
प्रकल्प प्रयोगशाळा सहाय्यक- बी – ३७ हजार ७०० रुपये.
तांत्रिक प्रशिक्षणार्थी (नागरी) – २३ हजार रुपये.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1O2Yl5m4aooZxE44ROw89VufY3dJ0JKBf/view