Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी: राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत गंगामाई हायस्कूल गर्ल्स तृतीय

राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने सलग दुसऱ्या वर्षी तृतीय स्थान पटकावले. राज्यस्तरीय शालेय शासकीय १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या खो-खो स्पर्धा नागपूर येथे झाल्या. स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इचलकरंजीच्या श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या संघाने तृतीय स्थानावर नाव कोरले. खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शहा, क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी, तात्यासाहेब कुंभोजे मार्गदर्शन लाभले.