Logo
राजकारण

मराठ्यांना रोखण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र; मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीनं प्रयत्न होत असून मराठा मुलांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा मुलांना त्रास देण्याचं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र रचलं असल्याचे देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत. मराठा समाजाच्या नेत्यांना जाहीर पणे सांगतो, गोरगरीबांच्या पोरांवर खोट्या केसेस करून ओबीसींचे नेते बीडला जाऊन पोरं, जात खचले पाहिजेत यासाठी ताकतीने प्रयत्न होत आहेत. मला अशीही माहिती मिळाले की ते काल बीडच्या एसपींकडे देखील जाऊन बसले होते आणि मुलांची नावे लिहून देत आहेत. पुरवणी यादी तयार करा व मराठ्यांच्या पाच-दहा हजार पोरांना गुंतवा असं सांगितलं जात आहे. हे षडयंत्र आहे. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात द्यावं अन्यथा गाठ मराठ्यांशी आहे असे मनोज जरांगे म्हणाले. उद्रेक करणाऱ्यांवर कारवाई करू नका असं आमचं म्हणणं नाही. पण जे सत्य आहे ते आहे. ओबीसीच्या काही नेत्यांच षडयंत्र मराठा नेत्यानी हाणून पाडावं. यांना वटतंत की खोटे गुन्हे दाखल केले की समाज खचेल. हे थांबवल नाही तर आम्हाला आमच्या पूर्वीच्या भूमिकेत यावं लागेल, आम्ही पण ५४ टक्के आहोत . देशात आम्ही जवळपास ३२ करोड आहोत , तुम्ही आम्हला त्या वाटेवर येऊ देऊ नका, असे मनोज जरांगे यावळी म्हणाले. बीड, नांदेडसह महाराष्ट्रातील एस.पी.वर पोलिसांवर दबाब आणला जातोय, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केलं. यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी खळबळजनक दावे केले आहेत. भुजबळांच्या पाहुण्यांचं हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडलंय असा दावा जरांगे यांनी केला. तसेच मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ताकदीनं प्रयत्न केले जातायत. मराठ्यांविरोधात सध्या मोठं षडयंत्र रचलं जातंय. मराठा मुलांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा मुलांना त्रास देण्याचं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र असा मनोज जरांगेंनी गंभीर आरोप केला आहे. मराठ्यांच्या मुलांविरोधात खोटे गुन्हे दाखल केल्यानं मराठे मुले घाबरतील आणि यांचं आंदोलन दडपून टाकू असं षडयंत्र ओबीसीचे नेते रचतायेत असेही जरांगे यावेळी म्हणाले. - ओबीसींना जास्तीचे आरक्षण घटनाबाह्य , अतिक्रमण केलेलं. कोणत्या नियमाने दिलं ? आता आमचं हक्काचं मिळतंय,आमच्याकडे पुरावे आहे ते देखील मिळू देत नाहीयेत. हे आरक्षण मराठ्याना आरक्षण मिळेपर्यंत थांबणार नाही, मराठे आता थांबणार नाही. - जी जागृती मराठा आणि ओबीसीमध्ये व्हायला पाहिजे होती ती झालेली आहे.त्यामुळे संघर्ष होणार नाही. संघर्ष केल्याने काहीच होणार नाही. सामान्य ओबीसी ना वाटत आहे पुरावे मिळत असतील तर प्रमाणपत्र द्यावे. - अहवाल बनविणे सुरू आहे, हक्काचं आरक्षण मिळणार आहे, या बाबत चर्चा झाली शुक्रवारी बैठकीनंतर अधिकृत माहिती देऊ असेही मनोज जरांगे यांनी सांगितले.