Logo
राजकारण

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार राष्ट्रपतींची भेट; कारण आलं समोर.

राज्यात घडामोडींना वेग आला आहे, अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत. त्याच्या या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. आज दुपारी नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेणार आहेत. दोघांच्या भेटीचे कारण देखील समोर आलं आहे. राज्यातील विधिमंडळासंदर्भात एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या भेटीसाठी नार्वेकरांना संध्याकाळची वेळ मिळाली आहे. सद्य परिस्थितीमध्ये दोन्ही नेत्यांच्या भेटीवर विविध चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, राज्यातील विधिमंडळासंदर्भात एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याची माहिती समोर आली आहे.