अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्यातील ग्रामीण भागातील वाढत्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेनं सर्व ग्रामपंचायतींना वन विभागाच्या सहकार्याने त्वरित जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिले आहेत.
मुख्य निर्देश:
✔ ग्रामपंचायत कार्यालयात ‘बिबट प्रतिबंध व सुरक्षा’ सूचना फलक लावणे
✔ ग्रामसभा, मासिक सभा, विशेष बैठकीत वन विभागाच्या सुरक्षा नियमांचे वाचन व मार्गदर्शन
✔ जनजागृती सभांसाठी वन अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रण
✔ नागरिकांना प्रत्यक्ष तज्ज्ञांकडून वैज्ञानिक, तातडीचे, अचूक मार्गदर्शन
🌿 वन विभाग प्रबोधन:
संगमनेर-अकोलेसह जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बिबट्यापासून संरक्षणाबाबत मार्गदर्शन. ही मोहीम आता इतर गावांमध्येही विस्तारली जाणार.
🛡 ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य!
जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवा आणि वन विभागाशी सतत समन्वय ठेवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.