Logo
राजकारण

ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांची उमेदवारी म्हणजे विकासाचे व्हिजन असणारं व्यक्तिमत्व - आमदार आशुतोष काळे

बऱ्याच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहिर झाल्यानंतर प्रत्येक मतदार संघात उलथा पालथी होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महत्त्वाची नगरपालिका म्हणजे कोपरगाव नगरपालिका होय. या कोपरगाव शहरात आज आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हयातील सर्वात मोठा राजकीय भुकंप घडविला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार आशुतोष काळे यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली आणि विरोधी पक्षासह संपुर्ण शहरासह तालुका आणि जिल्ह्याला जोरदार धक्का दिला आहे. बऱ्याच दिवसानंतर काका कोयटे यांना राजकारणात सक्रिय करुन थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे केले आहे. काका कोयटे यांची उमेदवारी म्हणजे विकासाचे व्हिजन असणारं व्यक्तिमत्व असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले. काका कोयटे यांच्या उमेदवारीने मात्र सर्व सामान्य मतदार आनंदी झाला असल्याची शहरात चर्चा सुरु झाली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी हा जबरदस्त मास्टर स्ट्रोक मारल्यामुळे शहरातील चर्चेचा नूरच बदलल्याचे बोलले जात आहे.अजुन नगराध्यक्ष पदासाठी कोणकोण उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि शेवट पर्यंत कोण कोण टिकणार यावर निवडणुकीची रंगत ठरणार आहे अशीही चर्चा रंगली आहे.