Logo
ताज्या बातम्या

बिबट्यासमोर प्रशासन हतबल, लोकप्रतिनिधींची प्रयत्नाची पराकष्ठा तरीही तालुक्यातील जनता त्रस्त

श्रमिक न्युज सौ सविता विधाते - कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या बिबट्याच्या भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. दर दिवशी महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या गावात, तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची बातमी येत आहे. प्रशासन फक्त थातूरमातूर कृती करते आणि आपल्या जबाबदारीतून मोकळे होत आहे. प्रशासनाचा वेगळाच तांडा सध्या समोर येत आहे. पोलीस प्रशासन ॲक्शन घेत नाही. ते म्हणते वन विभागाच्या अंतर्गत हा विषय येतो तर वनविभाग वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहत बसत आहे. सध्या कोपरगाव तालुक्यात मात्र बिबट्याची एवढी दहशत झाली आहे की एकाच आठवड्यात एकाच परिसरात दोन मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. या घटनेने संपूर्ण तालुका बिबट्याचे दहशतीखाली सध्या वावरत आहे. मुले शाळेत जात नाही, गोरगरीब मजूर कामावर जायला तयार नाही, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी तर भीतीमुळे कॉलेजला जाणे सोडले आहे . अशा प्रकारे संपुर्ण तालुका त्रस्त झालेला आहे.चार दिवसांपूर्वीच टाकळी फाटा येथे एक तीन वर्षीय मुलीची शिकार बिबट्याने केली होती, त्याची धग संपत नाही तोच आज पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात एका 60 वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या असून त्यांनी नगर मनमाड हा महामार्गावर हे आंदोलन करून रस्ता बंद पाडला आहे. प्रशासन आणि वनविभाग विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्याचे आज माजी आमदारांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी, मंत्री महोदय यांना याविषयी माहिती दिली. मात्र त्याचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. याचा अर्थ असा होत आहे की बिबट्यासमोर प्रशासन हतबल झाले आहे, लोकप्रतिनिधी उपाय योजनेसाठी कुठेतरी कमी पडत आहे तर तालुक्यातील जनता बिबट्याच्या त्रासाने त्रस्त झाली आहे.या बिबट्यापासून तालुक्याचे सुटका करण्यासाठी काही प्रयत्न होणार आहे की नाही? का अजून किती बळी जाणार असा गंभीर प्रश्न संपूर्ण तालुक्यातील जनतेला पडला आहे.