Logo
राजकारण

देवकर वस्ती शाळेत वह्यांचे मोफत वाटप

कोपरगाव - दिनांक 12 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवकर वस्ती येथे बिपिन कोल्हे अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह यांच्या वाढदिवसानिमित्त प्राप्त झालेल्या वह्यांचे वाटप पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर, सरपंच संदीप देवकर, उपसरपंच संजय देवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षसचिन देवकर, उपाध्यक्ष सचिन मालकर, कोपरगाव नगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत कडू, पालक चव्हाण, पावडे, उमेश डमाळे, सादिक शेख, योगिता ठाकरे यांच्या उपस्थित मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक मनोज सोनवणे यांनी केले. याप्रसंगी बिपिन कोल्हे यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक,व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. एक चांगले शैक्षणिक काम दादांच्या वाढदिवसानिमित्ताने होत आहे याबाबत सर्वांचे हार्दिक आभार मानण्यात आले असून बिपीन कोल्हे यांना शाळा व्यवस्थापन समिती व सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.