इचलकरंजी महानगरपालिकेकडून शहरास पाणीपुरवठा करणा-या कृष्णा पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी बदलणे तसेच सीईटिपी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामाची आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आणि संबंधित मक्तेदार यांना सदरची कामे तातडीने आणि गुणवत्तापूर्वक करण्याच्या सुचना दिल्या. याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांचेसह कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.