Logo
सरकारी योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2024

आज आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2022 माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे प्रमुख मुद्दे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे काय, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2022 प्रीमियम पेमेंट किती,अर्ज कुठे करायचा, प्रीमियमची रक्कम वेळेवर न भरल्यास काय होईल, प्रधानमंत्री सुरक्षा विमाधारकाला विम्याची देय रक्कम किती, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करावा, क्लेम pdf अँप्लिकेशन फॉर्म, संपर्क टोलफ्री नंबर या सर्व गोष्टींची माहिती आज या लेखात पाहणार आहोत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना 2024 या योजनेच्या संचालनाची पद्धत प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने प्रमाणे असणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्षिक बजेट २०१५-१६ मध्ये २८ फेब्रुवारी २०१५ रोजी जाहीर केले. भारतीय असंख्य लोक त्यांना कोणत्याही प्रकारचे जीवन विमा नाही, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही सुरु केलेली आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेचे यश लक्षात घेऊन, आपले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पूर्ण सुरक्षा उत्साहाने पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अमलात आणली आहे. भविष्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना ही जोडली जाईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघात विमा वार्षिक फक्त १२/- रुपये प्रीमियम वर केला जाईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ हा १८ वयोगटातील लोकांना घेता येईल. या योजनेअंतर्गत एखाद्या विमा धारकांचा अपघात झाला मृत्यू झाला किंवा अपघातात त्याचे दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय जर खराब झाले तर त्याला विमा या योजनेअंतर्गत प्रदान केला जाईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे प्रमुख मुद्दे – या योजनेसाठी प्रीमियम रक्कम ही वर्षाला १२/- रुपये असणार आहे. एक्सीडेंटल कवरेज (पूर्ण २ लाख / आंशिक १ लाख ) नियमानुसार देण्यात येतील जोपर्यंत तो रक्कम ठेवतो तोपर्यंत या योजनेअंतर्गत विमाधारकाचा कव्हरेज कालावधी असणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे काय? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना हा एक अपघात विमा पॉलिसी चा प्रकार आहे. या विमा पॉलिसीच्या विमाधारकांना अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आले तर त्याला विम्याच्या रकमेवर क्लेम म्हणजेच दावा केला जाऊ शकतो. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना एक वर्षासाठी वैध असेल, तर एक वर्षनंतर नूतनीकरण करावी लागेल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास २लाख रुपये आणि आंशिक अपंगत्व आले तर १लाख रुपये विमा रक्कम विमाधारकाला देण्यात येईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना २०२२ प्रीमियम पेमेंट किती? या योजनेसाठी वर्षाकाठी फक्त आणि फक्त १२/- रुपये भरावे लागतील. जे विमाधारकांच्या बँक खात्या मधून वजा केले जातील. प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत दरवर्षी १ जूनपूर्वी फॉर्म भरावा लागेल. फॉर्म सबमिट केल्यानंतर बँक खात्यातून तुमची प्रीमियमची रक्कम ही वजा केली जाईल. यासाठी आणखी दुसरा एक पर्याय आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन ते चार वर्ष दीर्घ मुदतीची व्याप्ती निवडावी लागेल. त्यानुसार प्रीमियमची रक्कम बँकेमार्फत दरवर्षी आपोआप खात्यातून वजा केली जाईल आणि तुमच्या विम्याचा प्रिमियम भरला जाईल. पंतप्रधान सुरक्षा विमा धारकाला या योजनेअंतर्गत ३१ मे पूर्वी प्रीमियम भरावे लागेल. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी सर्व प्रकारच्या नियुक्त कंपन्या आणि बँका मध्ये ही योजना सुरू केली गेलेली आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारचा अटींसह प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना इतर कंपन्यांचा देखील या योजनेत समावेश केलेला आहे. सध्या ही योजना एसबीआय बँक (SBI Bank) सुरू करेल नंतर ते इतर खाजगी बँक किंवा एलआयसी सह जोडले जाऊ शकते. प्रीमियमची रक्कम वेळेवर न भरल्यास काय होईल? प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत विमा रक्कम न भरल्यास बँक किंवा विमा कंपनीद्वारे रद्द केली जाऊ शकते. प्रीमियम न भरल्यास पॉलिसीचे नूतनीकरण केले जाऊ शकत नाही. बँक खाते बंद झाल्यास पॉलिसीदेखील बंद केली जाईल.जर एखाद्या विमाधारकाकडे दोन बचत खाती असतील आणि तो त्या दोन्ही खाती सुरक्षा विमा योजनेशी जोडलेली असतील. त्याचे प्रीमियम रक्कम दोन्ही खात्यांमधून जमा केली गेली असेल, तर विम्याची रक्कम केवळ एका खात्यावरच चालू ठेवली जाईल आणि दुसर्‍या खात्याने भरलेल्या प्रीमियमची रक्कम थांबवली जाईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमाधारकाला विम्याची देय रक्कम किती? जर विमाधारकाच्या मृत्यू झाला असेल, तर त्याला दोन लाख रुपये विमा म्हणून प्रदान केला जाईल. जर विमाधारकाच्या दोन्ही डोळे किंवा दोन्ही पाय किंवा दोन्ही हात निकामी झाल्यास म्हणजेच पूर्णपणे अपंग झाल्यास, त्या विमाधारकाला २ लाख रुपये विमा प्रदान केला जाईल. एका डोळ्यातील दृष्टी कमी झाल्यास आणि परत येण्यास असमर्थ झाल्यास किंवा एक हाताचा किंवा पायाचा वापर गमावल्यास म्हणजेच आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये विमा म्हणून देण्यात येईल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता – विमा अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय १८ ते ७५ वयोगटातील लाभार्त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. उमेदवारासाठी चालू बचत बँक खाते असणे बंधनकारक आहे. पॉलिसी प्रीमियमच्या ऑटो डेबिटसाठी अर्जदाराने संमती फॉर्मवर सही करावी लागेल. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची आवश्यक कागदपत्रे – अर्जदाराचे आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो बँक खाते पासबुक वय प्रमाणपत्र ओळखपत्र उत्पन्न प्रमाणपत्र मोबाइल नंबर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज कसा करावा? देशातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन या योजनेंतर्गत अर्ज करू शकतात. त्यानंतर आपल्याला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, आधार क्रमांक, ईमेल आयडी इत्यादी भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर, आपल्याला आपली सर्व कागदपत्रे अर्जासह जोडावी लागतील. मग तुम्हाला बँकेकडे तो अर्ज सबमिट करावा लागेल. PMSBY Important Links- अधिकृत संकेतस्थळ (PMSBY official website ) – jansuraksha.gov.in