तंत्रज्ञानाशी सांगड घालून पत्रकारिता करता यावी याकरिता इचलकरंजी शहरात अद्ययावत पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. इचलकरंजी शहरातील पत्रकारांसाठी असलेल्या पत्रकार कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. खासदार धैर्यशील माने यांच्या सहकार्यातून नूतनीकरण करण्यात आलेल्या या कक्षाचे उद्घाटन खासदार माने यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.