Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :यंत्रमाग कारखानदारांच्या घरात धाडसी चोरी

इचलकरंजी येथील शाहूनगर गल्ली नं. १३ येथे राहणारे यंत्रमाग कारखानदार चंद्रकांत मल्लिकार्जून म्हेत्रे यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यांनी तिजोरीचे लॉक तोडून तिजोरीतील १ लाख ६३ हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व त्यांच्या खिशातील १० हजाराची रोकड असा १ लाख ७३ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी चंद्रकांत मल्लिकार्जुन म्हेत्रे (वय ४३) यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. चंदूर रोडवर शाहूनगर गल्ली नं. १३ मध्ये चंद्रकांत म्हेत्रे हे कुटुंबासह राहण्यास आहेत.