कुणाचेही हिरावून नको. मात्र, इचलकरंजीला हक्काचे सुळकूडमधूनच पाणी घेऊ. धरण दुरुस्तीसाठी काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत आम्ही थांबू; पण पाणी सुळकूडचेच आणू, असे सूतोवाच आ. प्रकाश आवाडे यांनी केले. इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू नये, असे ज्यांना वाटते त्या मंडळींकडून महापालिका आयुक्तांवर दबाव टाकून शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करू दिले जात नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. एका कार्यक्रमात बोलताना आ. आवाडे म्हणाले, कमी पाण्याचे कारण देत जागा बदला असे सांगितले जात आहे.