Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :मुंबईतील बैठक म्हणजे केवळ नौटंकी: मदन कारंडे

इचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेली सुळकूड योजना कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायची नाही हाच राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुंबईतील बैठकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही बैठक म्हणजे केवळ नौटंकी असल्याचा आरोप मदन कारंडे यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केला. इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती सुळकूड योजनेवर ठाम असून भविष्यकाळात खासदार आमदारांना विचारात न घेता लढा सुरूच राहील, असा इशारा दिला. राज्य शासनाने अमृत २ अंतर्गत इचलकरंजीसाठी सुळकूड उद्भव दूधगंगा पाणी योजना मंजूर करून आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे.