बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) कडून ‘प्रशिक्षणार्थी अभियंता (Trainee Engineer) च्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची प्रक्रिया आयोजित केली आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ५१७ जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज करून शकता. BEL च्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १३ मार्च २०२४ आहे.
शैक्षणिक पात्रता
BEL मध्ये ‘प्रशिक्षणार्थी अभियंता साठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवारांकडे पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता असावी. या पदासाठी पात्र उमेदवाराकडे
बी.ई./ बी. टेक./ एम. इ. एम./एम. टेक अशी इंजिअरिग (इलेक्ट्रॉनिक्स, / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / दूरसंचार / कम्युनिकेशन / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / कॉप्युटर सायन्स / कॉप्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी / इन्फॉर्मेशन विज्ञान / माहिती विज्ञान यापैकी एका शाखेतून) पदवी घेतलेली असावी.
वयोमर्यादा, अर्ज शुल्क
या पदासाठी अर्ज करण्यामध्ये उमेदवाराचे २८ ते ३० असावे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला १५० रुपये आणि १८ टक्के जीएसटी अर्ज शुल्क म्हणून भरावे लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२४ आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bel-india.in/
अधिसुचना – https://bel-india.in/Documentviews.aspx?fileName=Final%20TE%20Web%20Advt%2028022024%20HLS%20and%20SCB-27-02-24.pdf
वेतन श्रेणी
प्रशिक्षणार्थी अभियंता सर्वसमावेशक एकत्रित मोबदला रुपये ३०,०००/- प्रति महिना कराराावर पहिल्या वर्षासाठी, दरमहा ३५, ००० रुपये दुसऱ्या वर्षासाठी आणि अनुक्रमे तिसऱ्या वर्षासाठी दरमहा रुपये ४०००० मिळतील.
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जाबरोबरआवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज शेवटच्या तारखेआधी अर्ज करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.