आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे. आरक्षणाची मर्यादा वाढविण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांनी आज ( दि.२९) माध्यमांशी बाेलताना केली. याप्रश्नी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे पाठपुरावा करावा, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील षडयंत्र थांबवावे, सरकारच्या चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे, असा पुन्नरुच्चारही त्यांन केला. .
१० टक्के मराठा आरक्षण न्यायालयात टीकणारे : बाबासाहेब सराटे
मराठा समाजाला कायदेशी पद्धतीने १० टक्के आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे मिळालेले हे मराठा आरक्षण न्यायालयात देखील टीकू शकते, असे मत मराठा आरक्षण अभ्यासक बाबासाहेब सराटे यांनी ‘पुढारी न्यूज’शी बोलताना मांडले.