Logo
ताज्या बातम्या

लोकसभेच्या तारखा जाहीर नाहीत

लोकसभा निवडणुकीच्या तारखा आम्ही जाहीर केलेल्या नाहीत. सोशल मीडियावर तारखांबाबत फिरत असलेले मेसेज फेक असून, खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. 12 मार्च रोजी आचारसंहिता लागणार, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 28 मार्च, 19 एप्रिलला मतदान होईल व 22 मे रोजी मतमोजणी होईल, असा मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा सर्व मजकूर निवडणूक आयोगाच्या लेडरपॅडवर दाखवण्यात आला आहे. एकाच दिवशी संपूर्ण देशात मतदान होणार आहे, असे या मेसेजच्या माध्यमातून पसरवले जात आहे. याची दखल घेत निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, सोशल मीडियावर निवडणुकीच्या तारखांबाबत फिरत असलेला मेसेज फेक आहे. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केलेल्या नाहीत. प्रथेनुसार निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करीत असते. असल्या खोट्या मेसेजचा प्रसार करू नका व सावध राहा, असे आवाहनही आयोगाने केले आहे.