Logo
ताज्या बातम्या

नोकरीची संधी! पाटबंधारे विभागामध्ये विविध पदांसाठी भरती; २९ जानेवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस

पाटबंधारे विभागामध्ये विविध पदासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २९ जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही परीक्षेविना या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही पदभरती महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागासाठी असणार आहे. या पदभरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता या पदांसाठी एकूण दहा रिक्त जागांवर नियुक्ती करायची आहे त्या निमित्ताने पाटबंधारे विभागाकडून जाहीर सूचना प्रकाशित करण्यात आलेले आहे. ही भरती सेवा करार आणि परिश्रमिक तत्वावर होणार आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्याला दोन दिवसाचा कालावधी बाकी असून, २९ जानेवारी पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवाराने आपले अर्ज उमेदवाराने सादर करायचे आहेत. अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण छत्रपती संभाजी नगर यांच्या अधिपत्याखाली असलेल्या विभागीय कार्यालयात विवक्षित कामे करण्यासाठी अनुभवी कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता यांची सेवा करार पद्धतीने एकूण दहा जागांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव, जन्मदिनांक व लिंग शैक्षणिक अर्हता, मोबाईल नंबर ईमेल आयडी, पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता व जाहिरातीमध्ये दिलेली इतर माहिती भरून किंवा टाईप करून अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत पेन्शन पे ऑर्डरची छायांकित प्रत जोडणे गरजेचे आहे. शिवाय, अर्जदारांचा अलीकडल्या काळातला क्लिअर फोटो अर्जावर लावायचा आहे. उमेदवारांसाठी महत्त्वाचे : सदर भरती अंतर्गत अर्ज करणार्‍या उमेदवारचे वय ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ६५ वर्षापेक्षा जास्त नसावे. उमेदवारावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या नसावा किंवा विभागीय चौकशी / कारवाई चालू अथवा प्रस्तावित नसावी. उमेदवाराला मुलाखतीचा खर्च दिला जाणार नाही. ही नियुक्ती फक्त तात्पुरत्या स्वरूपाची असून पूर्वसूचना न देता ही नियुक्ती संपुष्टात आणली जाऊ शकते. अर्ज करण्यासाठी कार्यकारी अभियंता नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग, वैजापूर या पत्त्यावर तुम्ही टाईप केलेले केव्हा लिहिलेले अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्यासाठी २९ जानेवारी २०२४ पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. मुलाखतीचा दिनांक वेळ व ठिकाण वैयक्तिकरित्या मोबाईलवर किंवा ईमेल आयडीवर कळवण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे त्याच्या मुळ प्रति सोबत आणायच्या आहेत जर हे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या पदासाठी पात्र समजले जाणार नाही.