Logo
सरकारी योजना

28 फेब्रुवारीला मिळणार ‘पीएम किसान’योजनेचा हप्ता

पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. गेल्यावेळी सरकारने 27 नोव्हेंबर 2023 रोजी 15 वा हप्ता जारी केला होता. आता सरकारने 16 वा हप्ता जारी करण्याची तारीखही जाहीर केली आहे. सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. कोणत्याही वर्गातील शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात. तथापि, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आणि जमीन नोंदणी पडताळणी करणे आवश्यक आहे. ई-केवायसी नसलेल्या लाभार्थींना 16 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे तीन हप्ते दिले जातात. या योजनेंतर्गत सरकारने आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. आता 28 फेब्रुवारी 2024 रोजी 16 वा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल. यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी डीबीटीद्वारे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता पाठवतील.