आपण आज या लेखात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना या योजनेचा आपल्या शेतकरी बांधवांनी कसा लाभ आपल्या शेतीसाठी करून घेयचा. त्यासाठी या योजनेचा अर्ज कुठे दाखल करायचा, लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ,लाभ कोणत्या शेतकऱ्यांना घेता येईल,या योजनेसाठी लागू असणाऱ्या अटी तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱयांना जल सिंचनाच्या कोणत्या गोष्टी मिळणार आहेत हे सर्व काही पाहणार आहोत. त्यासाठी संपूर्ण लेख वाचा.
लहान नळीद्वारे झाडाच्या मुळाला थेंब थेंबाने पाणी देण्याची आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे ठिबक सिंचन. या आधुनिक सिंचन प्रणालीमुळे अतिशय कमी पाण्यात सुद्धा पीक चांगले वाढते .थेंब थेंबाने पाणी दिल्यामुळे पाणी थेट मुळापर्यंत जाते आणि झाडाची पाण्याची गरज पुरेपूर भागली जाते. हीच गोस्ट लक्ष्यात घेता, राज्य शासनाने याचा लाभ आपल्या शेतकऱ्यांना करून द्यावा याच उद्दिष्टाने हि योजना राबवली आहे. तसेच महाराष्ट्र हा ठिबक सिंचनात अग्रेसर असून ६०% ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रातच केले जाते.
तुषार सिंचन प्रणालीद्वारे पंप, स्पिंकलर्स, वॉल्व्ह आणि पाईप्स द्वारे पाणी दिले जाऊन कमी पाण्यात चवली शेती करण्याची जलसिंचन प्रणाली आहे. या सिंचन प्रणालीचा वापर औद्योगिक आणि शेतीसाठी केला जाऊ शकतो. जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर लहान पावसासारखे शिंपडले जाते.या सिंचन प्रणालीद्वारेही पाणी कमी प्रमाणात वापरले जाते आणि तेही थेट पिकाच्या मुळाशी जाते.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत खालीलप्रमाणे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येणार आहे :
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५% अनुदान तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनावर मिळणार आहे. तर इतर राहिलेल्या शेतकऱ्यांना ४५% अनुदान मिळणार आहे.
पात्रता
जर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल, तर खालील शेतकऱ्याची पात्रता असणे अनिवार्य आहे :
शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे .
तसेच शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे .
अर्जदार अनुसूचित जातीजमातीचा असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे.
शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी विद्युत जोडणी आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी पावती सादर करणे गरजेचे आहे.
जर शेतकऱ्याने २०१६-१७ च्या आधी अश्या योजनेचा ;लाभ घेतला असेल तर पुढील १० वर्ष तरी त्या सर्व्हेनंबरसाठी त्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची नोंद घ्यावी.
शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेतच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्याला सिंचन प्रणाली विकत घेण्यासाठी पूर्वमंजुरी मिळाल्यावर अधिकृत विक्रेत्याकडून सिंचन विकत घेऊन ३० दिवसाच्या आत त्याच्या पावत्या अपलोड कराव्यात.
संपर्क
अधिक माहितीसाठी आणि अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या आणि पात्र असल्यास या योजनेचा अवश्य लाभ घ्या.आणि आणखी नवीन योजनांची माहिती साठी वारंवार या साईट ला भेट देत चला.