Logo
ताज्या बातम्या

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदांवर भरती सुरू

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नुकतीच काही पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. रिजॉल्वर या पदासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये या रिक्त जागा आहेत. सेवानिवृत्त बॅंक अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या भरतीद्वारे एकूण ९४ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यातील फॉर्म भरावा. हा फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला (sbi.co.in) भेट द्यावी. पात्रता काय असावी ? स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या या पदांवर अर्ज करण्यासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची गरज नाही. या पदांसाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभव, कामाचे ज्ञान आणि पात्रता असेल, अशा लोकांना या पदांसाठी प्राधान्य देण्यात येईल. शेवटची तारीख कोणती ? स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी १ नोव्हेंबरपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २१ नोव्हेंबर २०२३ आहे. त्यामुळे, या शेवटच्या तारखेपूर्वी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहेत, त्यासाठी उमेदवारांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या वेबसाईटवरून तुम्हाला या पदांच्या संबंधित अधिकची माहिती मिळू शकेल. कशी होणार उमेदवारांची निवड ? स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या या रिजॉल्वर पदांसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येईल. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे त्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. जे उमेदवार या पदांसाठी योग्य असतील त्यांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर, त्यांची निवड करण्यात यईल. त्यामुळे, इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आठवणीने जोडावीत. यामध्ये कोणतीही दिरंगाई करू नये.