मनोज जरांगे पाटील यांना काल (गुरूवार) सला ईन लावल्यानंतर जरांगे यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाल्याची माहिती जरांगे यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. कालपर्यत जरांगे उपचार आणि पाणी घ्यायला तयार नव्हते, मात्र मराठा आंदोलकांचा आग्रह आणि कोर्टाचे आदेश यामुळे जरांगे यांनी तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना सहकार्य करणं सुरू केले आहे.
आज सकाळी देखील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केली आहे. मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरू झाल्याने त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.