देशाच्या राजकारणातली या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राहुल गांधी यावेळी अमेठीतून लोकसभा न लढण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींनाही तेलंगणातून न लढण्याचा प्रस्ताव आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांना विनंती केल्याची या क्षणाची मोठी बातमी आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांची भेटही घेतल्याचं पुढे आलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे अमेठीतून निवडणूक लढणार नाहीत. मागच्या वेळेस ते लढले होते आणि त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. तसेच, सोनिया गांधीसुद्धा तेलंगणातून निवडणूक लढणार आहेत असं कळतंय. तसेच, राहुल गांधींच्यासुद्धा दोन्ही जागा या दक्षिण भारतातल्याच असतील.
गेल्या वेळी राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. त्यांच्या पराभवामुळे कॉंग्रेसला एक प्रकारे मॉरल ब्रेकडाऊन मिळाला होता. त्यामुळे राहुल गांधी यावेळी अनेठीतून निवडणूक लढणार नाहीत.
अमेठी हा गांधी परिवाराचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. त्या ठिकाणी स्मृती गांधी यांनी राहुल गांधी यांना मात दिली होती. त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे यावेळी राहुल गांधी कोणता मतदारसंघ निवडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.