सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी दुपारी एक वाजता प्रकाश आवाडे यांच्या आमदार फंडातून व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुरामुळे मंजूर झालेल्या 59 लाख रुपये निधीतून जवाहर नगर येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.यावेळी सुधाकर मनेरे, माजी नगरसेवक शकुंतला मुळीक, वसंतराव मुळीक, माजी नगरसेवक धुंडगे, जवाहर बँकेचे संचालक बबन टेकाळे, माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे, माजी नगरसेवक दत्तात्रय मांजरे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जवाहर नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने आमदार प्रकाश रावजी आवडे तसेच राहुल आवडे यांचा सत्कार करण्यात आला.