संसदीय अंतरिम अर्थसंकल्प मांडणीला बुधवार ३१ जानेवारीपासून संसदेत सुरूवात झाली. दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देषून अभिभाषण केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अंतरिम बजेट सादर केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.५) संध्याकाळी ५ वाजता लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देणार आहेत.
लोकसभा निवडणुकीआधीच्या शेवटच्या संसद अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (दि. ५) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देतील. त्यासाठी भाजपने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हिप बजावला आहे. बुधावार ३१ जानेवारी रोजी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले. प्रथेप्रमाणे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संयुक्त बैठकीत दोन्ही सभागृहांना संबोधित केले होते.