इचलकरंजी येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा व अ. भा. मराठी नाट्य परिषद शाखा यांच्या वतीने श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांच्या विविध शैलीमधील, अर्थपूर्ण कवितांचा आणि गीतांचा संस्मरणीय असा 'किती राहून गेलेले' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चौघीजणी, सातारा प्रस्तुत हा कार्यक्रम शुभांगी मदने, डॉ. आदिती काळमेख, शुभांगी दळवी आणि सविता कारंजकर यांनी सादर केला.