Logo
ताज्या बातम्या

नोकरीची सुवर्णसंधी! स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये भरती ; 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येणार

भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आनंदाची बातमी म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाअंतर्गत भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. मुदत वाढीमुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची आणखी संधी उपलब्ध झाली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप या भरतीमध्ये सामील होण्यासाठी फॉर्म भरलेला नाही आणि या भरतीसाठी पात्र आहेत ते आता वाढीव तारखेपर्यंत ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख आता 14 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर फॉर्म भरा. रिक्त जागांचा तपशील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरतीअंतर्गत कोच पदांच्या 214 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे उच्च कार्यक्षम प्रशिक्षकाच्या 9 पदांवर, वरिष्ठ प्रशिक्षकाच्या 45 पदांवर, प्रशिक्षकाच्या 43 पदांवर आणि सहाय्यक प्रशिक्षकाच्या 117 पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. महत्त्वाच्या तारखा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 10 जानेवारी 2024 पासून सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी आता 14 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भरती करता येणार आहे. SAI ने 31 जानेवारील 2024 रोजी सुधारित अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी अर्ज कसा करावा? या भरतीमध्ये प्रशिक्षक पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला सर्वात आधी sportsauthorityofindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आता होमपेजवर APPLY ONLINE जॉब्सच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. आता नवीन पेजवर दिसेल. आता तुम्हाला Register a New User पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर, उमेदवार विचारलेली माहिती योग्यरित्या भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका. वयोमर्यादा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत भरतीमध्ये उच्च कार्यक्षम प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 60 वर्षे, वरिष्ठ प्रशिक्षकासाठी 50 वर्षे, प्रशिक्षकासाठी 45 वर्षे आणि सहायक प्रशिक्षकासाठी 40 वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे 30 जानेवारी 2024 या तारखेपर्यंतचे वय लक्षात घेतलं जाईल. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.