मराठ्यांच्या जुन्या 'कुणबी' नोंदीच्या आधारावर त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने रात्री 2:30 वाजता राजपत्र आणि अध्यादेश जारी करत मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय दिला आहे. यामुळे कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्याच्या सग्या-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सरकारने मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या जारी केलेल्या अध्यादेशावर 15 दिवस हरकती घेतल्या जातील. त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून जीआर लागू होईल असं अध्यादेशात म्हटं आहे.
मराठा आरक्षणावर 15 दिवस हरकती घेता येणार
सरकारने 26 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या अध्यादेशात म्हटलं आहे की, मराठा बांधवांची कुणबी नोंदी साापडल्या आहेत, त्याच नोंदीीच्याा आधारावर त्यांच्या सर्व सग्यासोयऱ्यांना या नोंदींच्या आधारे कुणबी जाात प्रमााणपत्र देण्यात येतील. नवीन नियमामुळे बाधा पोहोचत असलेल्या व्यक्तींची हरकत लक्षात घेऊन त्यानंतर 16 फेब्रुवारी पासून अध्यादेश विचारात घेण्यात येईल. या अध्यादेशा संबंधित कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही हरकती प्राप्त झाल्यास, त्याआधी 15 दिवसांत आलेल्या हरकती सरकारकडून विचारात घेण्यात येतील.