भारतीय शेअर बाजार हाँगकाँगला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे. भारतीय शेअर बाजार विकासाच्या शक्यता आणि धोरणात्मक सुधारणांमुळे गुंतवणुकदार स्नेही बनला आहे. ब्लूमबर्गने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगच्या ४.२९ ट्रिलियन डॉलर तुलनेत भारतीय शेअर बाजारातील सूचीबद्ध स्टॉकचे एकत्रित मूल्य सोमवारच्या बंदपर्यंत ४.३३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. यामुळे भारत जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे. गेल्या ५ डिसेंबर रोजी त्याचे शेअर बाजार भांडवल प्रथमच ४ ट्रिलियन डॉलर पार झाले होते. त्यापैकी जवळपास निम्मे बाजार भांडवल गेल्या चार वर्षांत वाढले आहे.