Logo
ताज्या बातम्या

हनुमान गढी मंदिरात कंगनाकडून स्वच्छता

अभिनेत्री कंगना राणावत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रविवारी अयोध्येत दाखल झाली. तिने हनुमानगढी मंदिरात दर्शन घेतले व मंदिराची स्वच्छता केली. कंगना राणावतने यावेळी तेथे सुरू असलेल्या यज्ञातही सहभागी होत हवन केले. लाल बनारसी साडीत आलेल्या कंगनाने रामभद्राचार्य महाराजांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. ‘आओ मेरे राम’ असे शीर्षक दिलेली छायाचित्रांसह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.