Logo
आरोग्य

नगराध्यक्ष पराग संधान ॲक्शन मोडवर,विकास कामात गुणवत्तेत तडजोड होणार नाही

कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव शहरातील कर्मवीरनगर भागामध्ये अंतर्गत रस्त्यांचे प्रलंबित कामे सुरू करण्यात आली आहे त्याची पाहणी नगराध्यक्ष पराग संधान यांनी पदाधिकारी व नागरिकांसमवेत जाऊन केली आहे. कोपरगाव शहराला जोडणारा त्रिशंकू भाग पूर्वी कोपरगाव नगर परिषदेच्या अंतर्गत येत नव्हता त्यासाठी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी पाठपुरावा करून या भागाला शहरात जोडण्याचे काम केले. कुठलाही हद्दवाढ भाग शहरात आल्यानंतर त्याच्या विकासासाठी निधी शासन देत असते. या भागासाठी देखील निधी आला मात्र दुर्दैवाने लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे या भागातील कामे होऊ शकली नव्हती. नव्याने पालिकेत युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या नूतन पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे. आता थांबायचं नाही कामे करायची आहे अशी स्पष्ट भूमिका घेऊन सर्वच प्रभागात नगरसेवकांनी योग्य त्या प्रकारे कामांसाठी गती घेतली आहे. नेतृत्व बदलले की विकास दिसू लागतो याचा प्रत्येय कोपरगावकरांना येतो आहे. पाण्याची गुणवत्ता सुधारली, रस्त्यांवरची धूळ कमी होण्यास सुरुवात झाली, शहर स्वच्छतेचे अनेक कामे सुरू आहेत यासोबतच विविध विकास कामांना गती आली असून २०२४ मध्ये वर्क ऑर्डर झालेली कामे देखील अद्याप सुरू झाली नव्हती अशा ठेकेदारांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिले आहे. रस्त्यांची कामे करताना इस्टिमेट प्रमाणे कामाची गुणवत्ता राखली जायला हवी. डांबर मोजणीच्या पावत्या दाखवल्या जाणे गरजेचे आहे, कामासाठी मंजूर निधीचे रक्कम व देखभाल दुरुस्ती हे नागरिकांना समजण्यासाठी फलक लावले जायला हवे. आम्हाला श्रेय घेण्यासाठी काम करायचे नाही तर सेवा करण्याची भावना आमची आहे. केवळ फोटो काढण्यासाठी काही लोक काही प्रकार करत आहेत मात्र प्रत्यक्षात जनतेला सर्व काही ठाऊक आहे. कामे एवढे दिवस का होत नव्हती आता ती कामे सुरू का झाली आहेत व ती कामे गुणवत्तेत व्हावी यासाठी पालिका प्रशासन व आम्ही सर्व लक्ष देणार आहोत अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली आहे. यावेळी समवेत गटनेते प्रसाद आढाव, आरोग्य सभापती वैभव आढाव, नगरसेवक स्वप्निल मंजुळ,फिरोज पठाण, उमेश धुमाळ,वैभव गिरमे,निसार शेख, नईम शेख,आदींसह स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.